चेन्नई – तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुकने १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( Tamil Nadu Lok Sabha 2024) २१ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये विद्यमान खासदार, कनिमोळी, टीआर बालू आणि ए राजा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
उर्वरित १८ जागा काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके या मित्रपक्षांना दिल्या आहेत.पक्षाने आपला निवडणूक जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे.
सत्ताधारी पक्षाने निवडलेल्या २१ नावांपैकी ११ नवीन चेहरे आहेत. दयानिधी मारन, एस जगत्रक्षकन, कलानिधी वीरसामी, कथिर आनंद आणि सीएन अन्नादुराई यांनाही कायम ठेवण्यात आले आहे.
अन्य राज्यांमध्ये आघाडीच्या जागावाटपांविषयी अनेक प्रकारचे वादंग असताना तामिळनाडुत मात्र इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये समाधानकारकपणे जागा वाटप झाले आहे. या सत्तारूढ आघाडीला तामिळनाडुत चांगले यश मिळण्याचे भाकित जनमत चाचण्यांत व्यक्त करण्यात आले आहे.