- आणखी 123 बाधित
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 142 करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर नवीन 123 जणांना करोनाची लागण झाली.
सोमवारी (दि. 9) शहरात 123 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 66 हजार 112 जणांना करोनाची लागण झाली आहे.
आज दिवसभरात मागील तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4361 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 142 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 939 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4963 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 554 तर गृह विलगीकरणात 258 असे एकूण 812 करोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.