नवी दिल्ली – सोशलवर मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका मुलीने “मी काय पंतप्रधानांची मुलगी आहे का ज्यामुळे मला त्रास होणार नाही…’ व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. यावरून देशातील राजकीय नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
“हम क्या प्रधानमंत्री की बेटी है जो हमको कष्ट नहीं रहेगा। DC और SP के बच्चे पढ़कर ऑफिसर बनेंगे और हम लोग मजदूर के बच्चे अनपढ़ रहेंगें?”
झारखंड के कोडरमा जिले की रहने वाली शमा परवीन को सुनिए।pic.twitter.com/8G9vYKByLi
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) March 19, 2022
राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.व्हायरल विडिओ हा झारखंडच्या कोडरमा येथील आहे. येथील
मजूर मोठ्या प्रमाणात भंगाराचे काम करतात आणि त्यातून आपले घर चालावतात. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या कामावर बंदी घातली असून काही लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या बंदीचा विरोध करण्यासाठी कामगार आले होते. याच वेळी पत्रकरांनी तेथे उपस्थित समा परवीन नावाच्या मुलीला याबाबत प्रश्न विचारला असता तिने आपली प्रतिक्रिया दिली. तिने प्रतिक्रिया देताच काहीच क्षणात समा परवीनचा विडिओ सोशलवर तुफान व्हायरल झाला.
या व्हिडिओमध्ये ती म्हणाले,’माझ्या वडिलांवर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत त्यांच्यावरील खटला मागे घेतला जात नाही तोपर्यंत मी इथेच राहीन…तिने बंदी बाबत म्हणले,मी काय पंतप्रधानांची मुलगी आहे का ज्यामुळे मला त्रास होणार नाही. आम्हीसुद्धा भंगार वेचून पोट भरतो, अभ्यास करतो. आमचे भविष्य असेच उद्ध्वस्त करून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची मुले अभ्यास अधिकारी बनतील.’ असे समाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओमुळे मोदी सरकारवर टीका होत आहे