‘दुसरी लाट रोखण्यासाठी तातडीचे उपाय करा’

विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांची मागणी

पुणे : करोनाच्या बाधित रुग्णांचा आकडा 1 लाख 65 हजारांवर गेला असताना शहरात सद्यस्थितीत करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जगातील अनेक देशात या आजाराची दुसरी लाट आली आहे. तर, वैद्यकीय तज्ज्ञांनी पुण्यातही दुसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

धुमाळ म्हणाल्या की, शहरात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अनलॉकनंतर शहरात वाढलेली गर्दी, दिवाळीमुळे झालेली गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसात आणखी दिसण्याचा इशारा वैद्यकीत तज्ज्ञांनी दिला आहे.

त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ नियोजन करावे, अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.