Taiwan Earthquake : तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी होती. भूकंपामुळे राजधानी तैपेईतील काही इमारती हादरल्या मात्र नुकसानीचे अजून तरी काही वृत्त समोर आले नाही.
हवामान खात्याने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानमधील हुआलियन काउंटीजवळील समुद्रात 22.4 किमी (14 मैल) खोलीवर होता. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले आहेत.
सर्वजण आपापल्या इमारतीतून बाहेर आले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टेक्टोनिक प्लेट्सच्या जवळ असलेल्या स्थानामुळे, तैवानमध्ये अनेकदा भूकंप जाणवतात.
सप्टेंबर 2022 मध्ये तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.8 एवढी होती. या काळात सुमारे 150 जण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. यापूर्वी 2016 मध्ये दक्षिण तैवानमध्ये झालेल्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1999 मध्ये 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.