Saturday, April 27, 2024

Tag: fields

पूर्व हवेलीत घरादारांत, शेतात पाणीच पाणी…

पूर्व हवेलीत घरादारांत, शेतात पाणीच पाणी…

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती परिसरातील परिस्थिती लोणी काळभोर - हवेली तालुक्‍यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक ...

शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात जोमाने काम करावे; युवासेना सचिव वरुण सरदेसाई

शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात जोमाने काम करावे; युवासेना सचिव वरुण सरदेसाई

पुणे: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार विकासाचे सुवर्णयुग आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा, शिक्षण क्षेत्र तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध ...

हिवाळ्यात करा ‘या’ खास भाज्यांची निवड

करोनामुळे शेतातच कुजतोय भाजीपाला

 वाई - करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायदेखील बंद असल्याने भरमसाठ पैसे खर्च करुन भाजीपाला पिकविणारा विशेषत: हॉटेल व्यावसायिकांना विविध प्रकारच्या देशी विदेशी जातीच्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेणारा शेतकरी अडचणीत आला. सर्वकाही बंद असल्याने अक्षरश: शेतातच भाजीपाला कुजून जात आहे. एकंदरीतच आर्थिक नियोजन कोलमडल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला आहे. वाईच्या पश्चिम भागातील गोळेगांव येथील जितेंद्र गोळे या तरुणाने खडकाळ जमिनीवर चांगल्या प्रकारच्या स्टॉबेरीसह भाज्यांचे उत्पादन घेवून बेरोजगारीवर रामबाण उपाय शोधला आहे, शेती व्यवसायाला प्राधान्य देत महाबळेश्वर मधील हॉटेल्स व्यवसायिकांना लागणाऱ्या भाज्यांचे उत्पादन घेण्यावर भर दिला. जितेंद्र गोळे हा तरुण स्टॉबेरी, आंब्यासह चायनीज पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाला. संपूर्ण वर्षभर जितेंद्र गोळे यांच्यासह काही प्रगतशील शेतकऱ्यांनी महाबळेश्वर मधील हॉटेल्सना मागणी प्रमाणे भाज्या पुरवित असे, महबळेश्वरमधील हॉटेल व्यवसायिकांच्या भरवशावर चायनीज भाज्यांचे उत्पन्न घेत असे, परंतु सध्या करोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने महाबळेश्वरमधील सर्व हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भाजीपाला मागविण्यात येत नसल्याने गोळे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चायनीज भाजीपाला पडून आहे. याशिवाय वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागणी नसल्याने तो माल शेतातच कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोळेंसह परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांचे वर्षभरासाठीचे केलेले आर्थिक नियोजन पुरपणे कोलमडले आहे. चायनीज भाजीपाल्यांसाठी घेतलेले सोसायटी अथवा बॅंकेचे कर्ज थकणार असून बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी प्रचंड खर्च व सूक्ष्म नियोजन करावे लागते, त्यामुळे अशी अस्मानी संकटे उभी राहिल्यास बळीराजाने कोणाच्या तोंडाकडे पहायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही