शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात जोमाने काम करावे; युवासेना सचिव वरुण सरदेसाई

पुणे: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार विकासाचे सुवर्णयुग आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा, शिक्षण क्षेत्र तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता काम करणे गरजेचे आहे. ही मोठी जबाबदारी मी माझ्या युवासैनिकांवर सोपवत आहे. ही जबाबदारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी सक्षमतेने निभावतील, असा मला विश्वास आहे, असे युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित युवासेनेच्या पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने ते बोलत होते. युवासेनेचे पदाधिकारी अधिवेशन सिंहगड रोड वरील सान्वी हॉटेल इथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना पुणे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना युवसेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे आदी पदाधिकारी युवासैनिक उपस्थित होते.

सरदेसाई म्हणाले, पुण्यातील येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी देखील सर्वांनी तयारी करावी आणि शिवसेनेचा आवाज प्रत्येक घरा पर्यंत पोहचेल यासाठी कष्टाने प्रयत्न करावे. सर्वच युवा सैनिकांनी राज्यसरकार कडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना घरा घरात पोहचविण्यासाठी सर्व युवासैनिकांनी काम करावे.

यावेळी युवासेनेचे कार्यकारणी सदस्य रुपेश कदम यांनी आभार मानले. युवासेना पुणे शहर पदाधिकारी अधिवेशनाचे नियोजन युवासेना विभाग अधिकारी निरंजन दाभेकर, राम थरकुडे, चेतन चव्हाण, सनी गवते, श्रवण झगडे, दशरथ ख़िरीड मयूर पवार, युवासेना पुणे विद्यापीठ कक्षाचे कुणाल धनवडे, ज्ञानंद कोंढरे, परमेश्वर लाड यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.