देहूरोड – दोन महिन्यांपूर्वी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या तडीपाराकडूनच आदेशाचे भंग करताना हद्दीतून ताब्यात घेणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी साडेचारच्या सुमारास रावेत हद्दीतून भक्ती-शक्तीला जाणाऱ्या मार्गावर जल केंद्राजवळ घडले आहे.
निखिल साहेबराव साठे (वय 27, रा. दळवीनगर, चिकन चौक, निगडी) असे तडीपाराचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 च्या आदेशान्वये साठे याला दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. कोणत्याही आदेशाची परवानगी न घेता तडीपारी आदेशाचा भंग केला. रावेत हद्दीत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तो रावेत येथून भक्ती-शक्तीला जाणाऱ्या मार्गावरील जलकेंद्रजवळ उभा असताना पोलिसांनी त्याला जाब विचारीत विचारणार केली, असता पोलिसांशी झटापटी करीत शिवीगाळ दमदाटी केली. या प्रकारानंतर शासकीय कामात अडथळा आल्याने त्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी फौजदार बाळासाहेब गवारी तपास करीत आहेत.