पुणे (प्रतिनिधी) : मद्यपान केल्यानंतर तडीपार गुंडाने किरकोळ कारणातून स्वत:च्या आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार दांडेकरपुल परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी निलेश सुरेश जोगदंड (वय.28,रा. दांडेकर पुल, पेट्रोल पंपाशेजारी) याला अटक केली आहे.
तसेच त्याच्या विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बायडाबाई सुरेश जोगदंड (वय ४६, रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला आहे.