नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखली जाते. तीला बायोपिकची राणी म्हटले जाते. कधी ती पडद्यावर क्रिकेटर बनते, कधी अॅथलीट तर कधी नेमबाज. मात्र तापसी पन्नूने एका विशिष्ट भूमिकेसाठी तिची इच्छा व्यक्त केली आहे. तापसीने अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या, निर्मला सीतारामन यांच्या बायोपिकची कोणतीही योजना नाही, परंतु जर तापसीने तिची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर कदाचित बॉलिवूड दिग्दर्शक या विषयावर चित्रपट बनवण्यासाठी पुढे येतील.
तापसी पन्नूने पुरस्कार सोहळ्यात सांगितले की, निर्मला सीतारामन यांची भूमिका साकारणे ही सन्मानाची गोष्ट आहे, परंतु यासाठी त्यांची परवानगी मिळायला हवी. त्याच इव्हेंटमध्ये तापसीने इंडस्ट्रीतील पुरुष आणि महिला कलाकारांच्या फी मधील तफावतबद्दल तिची मते शेअर केली. या कार्यक्रमात तापसी पन्नूला निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
तापसी पन्नूच्या बायोपिक चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात ‘रश्मी रॉकेट’ ही अॅथलीटची कथा होती तर ‘सांड की आँख’मध्ये तिने नेमबाज प्रकाशी तोमरची भूमिका केली होती. तिच्या आगामी बायोपिक ‘शाबाश मिथू’मध्ये ती क्रिकेटर मिताली राजची भूमिका साकारत आहे. तापसी पन्नूचा शेवटचा रिलीज झालेला ‘लूप लपेटा’ हा चित्रपट होता. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर मिशन इम्पॉसिबल (तेलुगु), जन गण मन (तमिळ), दोबारा (हिंदी), शाबाश मिठू (हिंदी), बलार (हिंदी) आणि वो लडकी है कहां? (हिंदी) यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ती तिच्या आगामी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे.