दुबई :- टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आता रविवारी भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. पाकिस्तानने दोन्ही संघाचा पराभव केल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत.
भारत विरूध्द न्यूझीलंड या महत्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा न्यूझीलंडच्या बाजूनं लागला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Kane Williamson has won the toss and elected to field 🏏 #T20WorldCup | #INDvNZ | https://t.co/n7B0Dl7ph0 pic.twitter.com/7IcaKwlHLp
— ICC (@ICC) October 31, 2021
दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडलाही पाकिस्तानने पराभूत केले आहे. उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे.