नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व सलामीवीर शिखर धवन दुखापतीतून सावरले असून आगामी श्रीलंकेविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठी आणि आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोघांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच टी-२० मालिकेसाठी अतिरिक्त सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्मा व महमंद शम्मीला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. फिरकीपटू वाॅश्गिंटन सुंदर व संजू सॅमसन यांना टी-२० मध्ये संघात घेतले असले तरी एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी एकदिवसीय संघात रोहित शर्मा व केदार जाधव संघात परतणार आहे.
भारताची श्रीलंकेविरूध्द तीन टी-२० सामन्यांची मालिका ५ जानेवारीपासून सुरू होईल, यामध्ये पहिला सामना ५ जानेवारीला (गुवाहटी), दुसरा सामना ७ जानेवारीला (इंदूर) तर तिसरा सामना १० जानेवारीला (पुणे) होईल.
#INDvSL टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.
India’s T20 squad against Sri Lanka: Virat Kohli (Capt), Shikhar Dhawan, KL Rahul, Shreyas Iyer,Manish Pandey, Sanju Samson, Rishabh Pant (wk), Shivam Dube, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,Ravindra Jadeja, Shardul Thakur, Navdeep Saini, Jasprit Bumrah, Washington Sundar#INDvSL
— BCCI (@BCCI) December 23, 2019
आॅस्ट्रेलियाविरूध्दची एकदिवसीय मालिका १४ जानेवारीपासून रंगणार आहे. यामध्ये पहिला सामना १४ जानेवारी(मुबंई), दुसरा सामना १७ जानेवारी (राजकोट) तर तिसरा सामना १९ जानेवारी (बेंगळूरू) रोजी होईल.
#INDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा , शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर.
India’s ODI squad against Australia: Virat Kohli (Capt),Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, KL Rahul,Shreyas Iyer, Manish Pandey, Kedar Jadhav, Rishabh Pant (wk, Shivam Dube, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal,Kuldeep Yadav, Navdeep Saini,Jasprit Bumrah,Shardul Thakur, Mohd. Shami.
— BCCI (@BCCI) December 23, 2019
दरम्यान, भारतीय संघाच्या निवड समितीची ही अखेरची संघनिवड आहे. अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांच्या निवड समितीची मुदत या वर्षाअखेर संपत आहे.