दोहा : भारतीय महिला वेटलिफ्टर राखी हाल्देरने कतार इंटरनॅशनल कप स्पर्धेमध्ये ६४ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. यासह तिने दोन नवे राष्ट्रीय विक्रमही नोदंवले आहेत.
Indian #Weightlifting team ended its campaign at the 6th Qatar Cup International Weightlifting Championships in Doha with #RakhiHalder lifting the🥉medal in Women's 64kg event and smashing 2 New Senior #NationalRecords👏
Snatch 95kg 🅝🅡
Clean & Jerk 123kg
Tota 218kg 🅝🅡 pic.twitter.com/byIIhtuNiX— Team India (@WeAreTeamIndia) December 23, 2019
राखीने स्नॅचमध्ये ९५ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये १२३ किलो असे एकूण २१८ वजन उचलून नवे राष्ट्रीय विक्रम नोंदवले. यापूर्वी तिने जून महिन्यात राष्ट्रकूल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने स्नॅच आणि क्लिन अँड जर्क असे ( ९४ किलो + १२० किलो) एकूण २१४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले होते.
भारतीय खेळाडूंनी आॅलिंपिक पात्रतेच्या सिल्व्हर लेव्हल स्पर्धेत एकूण तीन पदके जिंकत आपल्या अभियानाचा शेवट केला. या स्पर्धेत मीराबाई चानूने सुवर्ण, जेरेमी लालरिनुंगाने रौप्य तर राखीने कांस्यपदक पटकावले.
यातील गुणांचा फायदा खेळाडूंना अंतिम यादीत होणार आहे. टोकियो २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेची अंतिम क्रमवारीची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.