बैरूत: सीरियन सरकारच्या सुरक्षा जवानांनी आणि लष्कराने देशाच्या उत्तरपश्चिीमी भागातील बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले तसेच त्यांनी जमिनीवरूनही रणगाड्यांद्वारेही तेथे तोफ गोळे डागले. त्यात किमान 23 नागरीक ठार झाल्याचे वृत्त आहे. हा सारा इडलिब प्रांताचा भाग आहे. तो जिहादींच्या ताब्यात आहे. या भागात महिनाभरासाठी शस्त्रसंधी जाहीर झाली होती. त्यामुळे त्या काळापुरती तरी येथे शांतता कायम राहील अशी अपेक्षा होती पण शस्त्रसंधीच्या काळातही तेथे हे हल्ले झाले आहेत.
या हल्ल्यात नागरीकांचीही मोठी जीवित हानी झाली असून सामान्य नागरीकांना याची मोठी झळ सोसावी लागली आहे असे ब्रिटनमधील मानवाधिकार संघटनेच्या सीरियातील निरीक्षकांनी म्हटले आहे. यातील जखमींची संख्या तीसहून अधिक आहे असे त्यांनी म्हटले आहे. या प्रांतातीाल अनेक खेड्यांवर हे हल्ले झाले त्यात महिला आणि मुलांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे. सीरियात सन 2011 पासून अंतर्गत यादवी व संघर्ष सुरू आहे त्यात आत्तापर्यंत किमान 3 लाख 70 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.