स्विर्त्झलॅन्ड सरकारची नीरव मोदीवर मोठी कारवाई; चार बँक खाती जप्त

नवी दिल्ली – भारताचे अब्जावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला नीरव मोदीवर स्विर्त्झलॅन्ड सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने चार बँक खाते जप्त केली आहेत. सरकारच्या या कारवाईनंतर नीरव मोदीला जवळपास ६ मिलियन डॉलरवर पाणी सोडावे लागणार आहे. नीरव मोदीसमवेत त्याची बहीण पूर्वीच्या बँक खात्यावरही सरकारने जप्ती आणली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी संचानालयाने विनंतीवर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, भारतातील बॅंकांचे कर्जबुडवून अँटिगुआ देशाचे नागरीकत्व घेतलेला भारतातला हिरेव्यापारी मेहुल चोक्‍सी याचे आमच्या देशाचे नागरीकत्व रद्द करून त्याला त्याच्या देशात परत पाठवण्यात येईल अशी घोषणा अँटिगुआचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी केली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला १३ हजार ४०० कोटी रूपयांना फसवल्याच्या प्रकरणात मेहुल चोक्‍सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोन प्रमुख आरोपी आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न भारताच्या ईडीने हाती घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.