मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. बॉलिवूड पासून ते साऊथ पर्यंत सर्वांनीच ‘झुंड’ बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे.
सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न उरी घेऊन निघणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ‘झुंड’मध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान असो…वा साऊथ सुपरस्टार धनुष… चित्रपटसुष्टीतील सर्वच दिग्गज कलाकारांनी चित्रपटावरुन नागराज मंजुळेंवर आणि चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमरदार रोहित पवार यांनी सुद्धा झुंड चित्रपटाचं कौतुक करणार एक ट्विट पोस्ट केलं आहे.
‘फँड्री’ व ‘सैराट’च्या यशानंतर @Nagrajmanjule जी यांनी @SrBachchan साहेबांसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय! झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टिमवर आधारित त्यांचा ‘#झूंड‘ हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो.
मी चित्रपट गृहात जाऊन #Jhundthemovie बघणार!
तुम्हीही बघा! pic.twitter.com/P9o4YyPuhP— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 4, 2022
काय काय म्हणाले… रोहित पवार
‘फँड्री’ व ‘सैराट’च्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टिमवर आधारित त्यांचा ‘झूंड’ हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो. मी चित्रपटगृहात जाऊन #Jhundthemovie बघणार आहे, तुम्हीही बघा !, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.