Swara Bhasker | Rahul Gandh | Bharat Jodo Nyay Yatra : अभिनेत्री स्वरा भास्कर या आज राहुल गांधी यांच्या मुंबईतील न्याय संकल्प यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना या यात्रेचे जोरदार समर्थन केले.
त्या म्हणाल्या की, “यात्रेच्या नावातूनच त्याचा उद्देश स्पष्ट होतो आहे. हा देश प्रेमासाठी प्रसिद्ध असताना गेली दहा वर्ष आपल्याला द्वेषाचा आजार झालेला आहे. ( Swara Bhasker | Rahul Gandh )
त्यातून आपला देश बाहेर आला पाहिजे त्यासाठी राहुल गांधी यांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. दोन यात्रांमधून त्यांनी संपुर्ण देश पिंजून काढला आहे. आणि त्यांनी लोकांच्या मनात स्वताचे स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या इतकी मोठी यात्रा काढणारा दुसरा कोणी राजकारणी आपल्या पहाण्यात आलेला नाही असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या समवेत आजच्या यात्रेत भाग घेतल्याचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.