UP News: देवी लक्ष्मी चार हातांनी कशी जन्म घेऊ शकते? न्यायालयाने स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले
Swami Prasad Maurya । हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे समाजवादी पार्टीच्या नेते माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य अडचणीत सापडले आहे.
लक्ष्मीदेवीवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लखनऊमधील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने शनिवारी वजीरगंज पोलीस ठाण्याला मौर्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
न्यायाल्याने वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सात दिवसांत एफआयआरची प्रत न्यायालयात पाठवण्यास सांगितले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर लक्ष्मी देवीबाबत वादग्रस्त विधान करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.
विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस मौर्य यांच्या विरोधात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत चौकशीचे आदेश दिले.
तक्रारदार रागिणी रस्तोगी यांनी आरोप केला आहे की, ‘गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’
रस्तोगी यांच्या तक्रारीनुसार, मौर्य यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, जेव्हा विविध धर्माचे लोक दोन हात आणि दोन पाय घेऊन जन्माला येतात, तेव्हा लक्ष्मी चार हातांनी कशी जन्माला येऊ शकते. मौर्य यांनी अनेक प्रसंगी असे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.’
स्वामी प्रसाद मौर्य यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
‘गेल्या वर्षी दिपावलीच्या दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून वाद निर्माण झाला. १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देशभरात लोकांनी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं. दरम्यान, मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले . तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.’
हे वाचाल का ? ‘मोदींची गॅरेंटी’ विरुद्ध काँग्रेसचे बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांना मदत’ हे मोठे मुद्दे ‘या’ लोकसभा निवडणुकीत गाजवतील