नेवासा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) व ग्रामपंचायत भानसहिवरा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत कविजंग बाबांची समाधी असलेली ऐतिहासिक गढी व परिसरात ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.
ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष मेकॅनिकल विभाग, सिव्हिल विभाग, कॉप्यूटर विभाग व इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ केला. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, प्राचार्य एच.जे.आहिरे आणि ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रा.योगेश मानळ, प्रा.वैभव दुधे, प्रा.राजेंद्र घुले, प्रा.शुभम वाबळे, प्रा.गौरव लांडगे, प्रा.अजय बाविस्कर, प्रा.विशाल काळे, प्रा.सुदर्शन शिंदे, प्रा.मगर, प्रा.पागिरे, प्रा.मानगुडे, प्रा.खुळे उपस्थित होते.