निघोज (वार्ताहर) – येथील पुजा प्रशांत पवार (पंधे ) आणि प्रा. प्रशांत पवार यांचे पेटंट भारत सरकारच्या बौद्धिक संपदा अधिकार कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मेडिकल क्षेत्रात डायग्नोस्टिक विभागात मेंदूविकार आणी मेंदूतील गाठीचे निदान करण्यासाठी ब्रेन ट्यूमर डिटेक्टिंग डिवायस यासाठी भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयामार्फत डिझाईन पेटंट जाहीर झाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
प्रा.प्रशांत पवार हे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येथील सेवानिवृत्त प्राचार्य अशोक वामन पवार व वैशाली अशोक पवार यांचे चिरंजीव आहेत.
प्रा. प्रशांत पवार यांच्या पत्नी पुजा पवार (पंधे ) या न्यू लाईफ फार्मास्युटिकल पुणे येथे अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पूजा या निघोज येथील कन्या असून प्रगती प्रेसचे मालक संजय पंधे, लिलाबाई पंधे यांच्या कन्या आहेत.
रुपेश पंधे यांची बहीण आहे. पुजा यांचे शिक्षण निघोज येथील जिल्हा परिषद शाळा, मुलिकादेवी विद्यालय तसेच पुणे येथील उच्च महाविद्यालयात पूर्ण झाले . पवार दापंत्य हे हुशार असल्याने त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे