नवरात्रीच्या निमित्ताने बॉलिवूडमधील बहुतेक कलाकार देवी पूजेसाठी मुद्दाम वेळ देतात. देवीच्या मंदिरामध्येही जातात. याच दरम्यान सुष्मिता सेनचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुष्मिता आपल्या मुलींसह धनुची नाच करताना दिसली आहे. सुष्मिताच्या बरोबर तिच्या ऍलिजा आणि रीने देखील सुष्मिताच्या स्टेप्स फॉलो करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुष्मिता सेनचा हा व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे.
हा व्हिडिओ सुष्मिताने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो आजही व्हायरल होतो आहे. धनुची डान्स हा एक पारंपारिक नृत्यप्रकार आहे. दुर्गापूजेच्या निमित्ताने हे नृत्य केले जाते. सुष्मिता या डान्समध्ये अगदी पारंगत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाख लोकांनी बघितला आहे आणि तितक्याच लोकांनी लाईकदेखील केला आहे.
सध्या आपल्या दत्तक मुलींबरोबर मजेत आयुष्य जगणाऱ्या सुष्मिताच्या बॉयफ्रेंडची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. तिच्या लग्नाची जुळवाजुळवही सुरू असल्याचे ऐकिवात आले होते. पण सुष्मिताने या गोष्टींचे खंडनही केलेले नाही आणि समर्थनही केलेले नाही.