मुंबई – बॉलिवूडच्या चित्रपटांना फ्लॉपची गळती लागलेली असताना वेब सिरींजचा मात्र चांगलाच बोलबाला आहे. एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मची नोंदणी केली की हवा तेवढा चांगला कंटेन्ट पाहायला मिळतो.मिस युनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या आपल्या आगामी हटके वेब सिरीजमुळे चर्चेत आली आहे. ज्यात सुष्मिता एका किन्नरची भूमिका निभावत आहे.
या सिरींजमधील सुष्मिता सेनचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. ज्यानुसार सुष्मिता एका समाजसेवा करणाऱ्या किन्नराची भूमिका निमगावात आहे. सुष्मिताने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून आपला लूक शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी’ असे कॅप्शन देत सुष्मिताने आपला लूक सर्वांसमोर आणला आहे.
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांमध्ये सुष्मिता आपल्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत होती. सुष्मिताने फॅन्सला सरप्राईझ देत आपल्या नव्या रोलबद्दल माहिती दिल्यानंतर अनेकांनी तीच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.