भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली:  भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंगळवारी रात्री उशीरा सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला स्वराज यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून सध्या अनेक केंद्रीय मंत्री एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत.

Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away. pic.twitter.com/4L59O73xQU

— ANI (@ANI) August 6, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.