सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गडकरी आदी नेत्यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली.

हे ठरले स्वराज यांचे शेवटचे ट्विट..

प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी.
@narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.

Leave A Reply

Your email address will not be published.