मुंबई – महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलच बदलताना दिसत आहे. सत्तेसाठी आमदार फोडन हे राजकारणासाठी नवीन नाही मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील पक्षांवर दावा सांगणारे नवे राजकारण पाहायला मिळत आहे. या राजकारणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील फूट पडल्यानंतर सर्व सामान्यांना देखील धक्का बसला.अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदाची शपत घेतानाच एक फोटो ट्विट केला आहे.
हा फोटो शरद पवार यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपत घेतली त्यावेळेसचा आहे. सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेंव्हा जसा होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आता देखील आहे.”
आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेंव्हा… pic.twitter.com/rlrhnVRD3E
— Supriya Sule (@supriya_sule) July 18, 2023
आज एकीकडे शरद पवार यांनी बंगळूर येथील विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावली. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला हजेरी लावल्याचे समजते. महाराष्ट्रातील इतके बदलत राजकरण यापूर्वी सर्वसामान्यांना पाहायला मिळाले नव्हते.
अमोल कोल्हेंनी देखील केला फोटो रिट्विट
सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला शरद पवारांच्या पहिल्या शपतविधीचा फोटो रिट्विट केला आहे. कोल्हे यावेळी लिहितात,”वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांचा उत्साह व ऊर्जा वयाच्या 83 व्या वर्षीही अगदी तशीच आहे.अशा लोकनेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला मिळतेय, हे माझं भाग्यच !”
वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांचा उत्साह व ऊर्जा वयाच्या 83 व्या वर्षीही अगदी तशीच आहे. अशा लोकनेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला… https://t.co/aSjWClOJTZ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 18, 2023