मुंबई – अभिनेता अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडली आहे. गेली अनेक दशके ते बॉलिवुडमध्ये आहेत. 1990 चे दशक त्यांनी गाजवले. त्यानंतर ते आता त्यांच्या वयाला साजेशा भूमिका साकारत असतात. थोडक्यात सक्रिय आहेत अन विशेष म्हणजे अगदी फिट आहेत. अनिल कपूर यांना त्यांचे प्रेक्षक सुपरफिट म्हणून ओळखतात.
View this post on Instagram
मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर जर्मनीमध्ये आहेत. त्यांनी जर्मनी टूरमधील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडियो शेअर करतांना त्यांनी आपल्या आजाराबाबत थोडक्यात सांगितले आहे.
View this post on Instagram
ते या व्हिडियोतील कॅप्शनमध्ये लिहितात,’बर्फ पडत असताना मी वॉक करत आहे. आज जर्मनीमधील शेवटचा दिवस आहे. मी आज डॉ. मुलेर यांना शेवटच्या ट्रीटमेंटसाठी भेटणार आहे. त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मानापासून आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
त्यांचा या कॅप्शनमुळे सध्या सोशलवर मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.हे कॅप्शन वाचून अनेकांना अनिल कूपर यांना काय झाले आहे? ते कोणत्य आजाराने त्रस्त आहेत? असे अनेक प्रश्न पडले आहेत.
View this post on Instagram
गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे ऍचिलीस टेंडिनाइटिसने या आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले आहे. या आजारात पायांना सूज येऊन टाचांचा भाग दुखू लागतो. अनिल कपूर याच आजारावर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेलेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण अनिल कपूर यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.