नवऱ्यासाठी सनी लिओनची लव्ह नोट

सनी लिओनचा नवरा डॅनिएल वेबरचा रविवारी 41वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सनीने रविवारी एक लव्ह नोट पोस्ट केली आहे. डॅनिएल एक चांगला पती आणि पिताही आहे. त्याच्याबाबतचे प्रेम आपल्या मनामध्ये कशाप्रकारे वाढत गेले, हे आपल्याला कळलेही नाही, असे सनीने म्हटले आहे.

डॅनिएलबरोबर इतकी वर्षे राहिल्यानंतरही त्याच्याबद्दल आपल्या मनात किती प्रेम आहे, हे आपल्याला समजू शकलेले नाही. डॅनिएल साहसी, खूप स्मार्ट, उदार, केअरिंग, निस्वार्थी आणि सगळ्याच महत्वाचे म्हणजे खूप चांगला पती आणि पिता आहे, असे सनीने म्हटले आहे. यावेळी सनीने डॅनिएअलबरोबरच्या आपले दोन फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सनीने डॅनिएल वेबरबरोबर 2011 मध्ये लग्न केले होते. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. 2017 मध्ये या दोघांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. त्यानंतर गेल्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना सनीने जन्म दिला आहे. आता आपल्या संसारावर लक्ष केंद्रीत करायचे असे सनीने म्हटले आहे.

लग्नाच्या काही दिवस आगोदरपासूनच तिने पोर्न फिल्ममध्ये काम करणे बंद केले होते. त्यानंतरच तिच्या संसाराला निर्विघ्न सुरुवात झाली होती. आपल्या गत आयुष्याची जराही छाया तिने संसारावर पडू दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.