आलिया भट्टचे अंडरवॉटर फोटोशूट

बॉलिवुडमधील सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून आलिया भट्‌टची ओळख आहे. तिच्या अभिनयच नव्हे, तर तिची ड्रेसिंग स्टाईलही गजब आहे. मात्र, सध्या आलिया एका अंडरवॉटर फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हा फोटो फॅशन मॅनजीन “वोग’वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आलियाने या फोटोशूटचे कव्हर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोशूटची चाहत्यांनी भरभरून स्तुती केली आहे. या कव्हर फोटोत आलिया नियॉन ग्रीन बिगीनी स्टाईल ड्रेसमध्ये दिसते. ही पोज तिने पाण्यात दिलेली आहे. चाहत्यांच्या मते हा आलियाचा आतापर्यतच बेस्ट लुक आहे.

दरम्यान, आलियाने आतापर्यत केलेल्या प्रत्येक लुकला चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. अनेक मुली तिच्या स्टाईल आणि लुक्‍सचे अनुकरण करत असतात. वर्कफ्रंटबाबत सांगायाचे झाल्यास ती सध्या आपले वडील महेश भट्‌ट यांच्या आगामी “सडक-2′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात पूजा भट्‌ट आणि संजय दत्तच्या मुलीची भूमिका आलिया साकारत आहे. याशिवाय “तख्त’ आणि “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही ती झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.