बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचा हॉट अंदाज हा चाहत्यांना नेहमीच आवडत असतो. सध्या ती आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहात आहे. या काळातही सनी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहात असते. रोजच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं हे ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या ती बॉक्सिंग शिकते आहे.
ट्रेनिंगच्या पहिला दिवसाचा फोटो तिने पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. ट्रेनिंगच्या आधी आणि नंतर माझा चेहरा असाच टमाटरसारखा लाल असतो, हे सगळं सहन करत मी पुन्हा यासाठी तयार आहे, असे तिने कॅप्शन दिले आहे.
सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर बाहेर देशात आहे. दत्तक घेतलेल्या तिन्ही मुलांना ती काहीना काही शिकवण्यात व्यस्त असते. मुलीला पोहणे शिकवत होती. त्याचा व्हिडियोसुद्धा तिने शेअर केला होता.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सनी लिओनी लवकरच आगामी “कोका कोला’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय “रंगीला’ आणि “विरमादेवी’ चित्रपटात ती काम करत आहे.