सनी देओल फिल्मी; तर मी खरा फौजी – अमरिंदर सिंग

चंडीगढ – लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला बॉलीवूड अभिनेता सनी देओल याची पंजाबचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी खिल्ली उडवली आहे. सनी फिल्मी; तर मी खरा फौजी आहे, असे अमरिंदर यांनी म्हटले आहे.

सनीने अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याला त्या पक्षाने पंजाबच्या गुरदासपूरमधून उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड निवडणूक लढवत आहेत. जाखड यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या समवेत अमरिंदरही होते. पत्रकारांनी सनीबाबत विचारल्यावर अमरिंदर यांनी वरील उत्तर दिले. बॉर्डर या युद्धविषयक चित्रपटात काम केल्याने सनी खरा फौजी ठरत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सनीला मतदारसंघात कुठलाही जनाधार नाही. त्यामुळे त्याची उमेदवारी जाखड यांच्यासाठी आव्हान ठरणार नाही. भाजपचा उमेदवार म्हणून त्याचा पराभव होईल, असे भाकीत त्यांनी यावेळी केले. कॅप्टन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरिंदर यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी लष्करात सेवा केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.