कुस्तीवरील सिनेमामध्ये सुनिल शेट्टी कोचच्या रोलमध्ये

कन्नडमध्ये “पहेलवान’ हा कुस्तीवरील मोठा सिनेमा होणार आहे. कन्नड अभिनेता किच्छा सुदीप या सिनेमाचा हिरो असणार आहे. यामध्ये सुनिल शेट्टी कुस्ती कोचच्या रोलमध्ये दिसणार आहे. कन्नडमधील सर्व सिनेमांचे रेकॉर्ड ह “पहेलवान’ मोडेल, अशी आशा केली जात आहे. कन्नडमधील या बहुचर्चित सिनेमाचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

या ट्रेलरला सोशल मिडीयावर भरपूर लाईक मिळायला लागले आहेत. या ट्रेलरच्या पहिल्या भागात किच्छ सुदीप कुस्तीचे प्रशिक्षण घेताना दिसतो, तर उत्तरार्धात तो बॉक्‍सिंग करताना दिसतो. त्याच्या आयुष्यात सतत येणाऱ्या उतार चढावांमध्ये कोच सुनिल शेट्टी त्याला सतत प्रेरणा देत असतो. सुनिल शेट्टीने आतापर्यंत अशाप्रकारे सिनिअरचा रोल कधीच केलेला नाही. त्यातही हिंदी सोडून अन्य भाषेमध्ये मिळालेल्या या रोलमुळे तो खूपच उत्साहात आहे.

अशाप्रकारे सर्वसामान्यांच्या खेळाशी संबंधित रोलमधून पुन्हा एकदा लोकांसमोर जाण्याची संधी खूपच छान आहे, असे तो म्हणाला. जरी “पहेलवान’ कन्नडमध्ये तयार होणार असला, तरी हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम या अन्य भाषांमधूनही तो रिलीज होणार आहे. 12 सप्टेंबरला हा “पहेलवान’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.