“सेक्रेड गेम्स 2′ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

बहुचर्चित आणि तितकीच वादग्रस्त वेबसीरिज “सेक्रेड गेम्स 2′ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानने साकारलेल्या भूमिकेमधील एका सिनमुळे ही वेब सीरीज वादामध्ये सापडली आहे. दिल्लीचे आमदार मंजिदर सिंह सिरला यांनी सेक्रेड गेम्स या वेबसीरीजवर जोरदार टीका केली आहे.

सेक्रेड गेम्स या वेबसीरीजमध्ये सैफ अली खानने सरदारची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये त्याचे नाव सरताज असे आहे. सैफ या वेबसीरीजमधील एका दृष्यात हातात घातलेला कडा काढून समुद्रात फेकून देतो. यावरुनच हा वाद झाला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मंजिदर सिंह सिरसा यांनी दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यावर निशाणा साधला आहे.

याप्रकरणी दिल्लीचे राजोरी गार्डन विधानसभा मतदार संघाचे आमदार मंजिदर सिंह सिरसा यांनी वेबसीरीजमधील हा सीन ताबडतोब काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसंच त्यांनी धमकी देखील दिली आहे. जर असे झाले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. सिरसा यांनी सांगितले की, ‘शीख धर्मामध्ये कडा घालणे ही धार्मिक परंपरा आहे. अशामध्ये त्याला काढून फेकणे हा धर्माचा अपमान आहे. त्यामुळे या सीनला काढून टाकावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)