मुंबई – मनदीप सिंग, ख्रिस गेल व कर्णधार लोकेश राहुल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने धडाक्यात सुरुवात केली. कर्णधार राहुल स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला. त्यावेळी पंजाबच्या 47 धावा झाल्या होत्या. त्यानंतर गेल व मनदीपने संघाला विजयाच्या मार्गावर आणले.
या विजयानंतर सर्वच स्तरातून मनदीपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवारचा विजय पंजाबच्या संघाने मनदीपच्या वडिलांना समर्पित केला. तर सोमवारी मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर आभाळाकडे पाहात ते वडिलांना समर्पित केलं. अर्धशतक झळकावल्यानंतर वर आकाशाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन करतानाचा मनदीपचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेता सुनील शेट्टीही मनदीपची ही खेळी पाहून एक भावनिक पोस्ट केली आहे.
मनदीपची हीच खेळी पाहून अभिनेता सुनिल शेट्टीने एक ट्विट केलं आहे. सुनिलने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्धशतक झलकावल्यानंतर मनदीप आकाशाकडे पाहाताना दिसत आहे. “जेव्हा वडील तुम्हाला आशिर्वाद देत असतात. मनदीप सिंग तुला सलाम,” अशी कॅप्शन सुनील शेट्टीने या फोटोला दिली आहे.