नवी दिल्ली – भारतात कोरोनाचा धोका व संसर्ग वाढत आहे. त्याचा सामना करण्यासाठी सरकार व वैद्यक पातळीवर प्रचंड गांभीर्याने प्रयत्न सुरु आहेत, अशा परिस्थितीत आपणही एक जबाबदार नागरिक या भूमिकेतून त्याला सहकार्य केले पाहिजेत,असे आवाहन लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी देशवासियांना केले आहे
तसेच, कोरोनामुळे भारतीय संघाच्या क्रिकेट मालिका स्पर्धा रद्द झाल्याने मी देखील गेले काही दिवस घरातच बसून आहे. अगदीच महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा अन्यथा घरीच थांबा व आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या,असे आवाहनही गावसकर यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी 64 झाली आहे, तर देशात 200 हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. तसेच राज्यसरकारबरोबरच सेलिब्रिटी, खेळाडू हे देखील सोशल मीडियाव्दारे कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत.