पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाच्या चटक्याने पुणेकर हैराण झाले असून पाण्याची मागणी वाढत आहे, अशातच ऐन उन्हाळ्यात महापालिकेकडून तातडीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी गुरूवारी (दि. ४) शहराच्या बहुतांंश भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. उन्हाळ्यात जलवाहिनींच्या दुरूस्तीचा मुहूर्त पाणी पुरवठा विभागाला मिळाला का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या भागातील पाणी पुरवठा बंद
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक संपूर्ण, येवलेवाडी, खडीमशिन आणि सर्व परिसर.
जुने वारजे जलकेंद्र : रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हाय-वे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी, भुगाव रोड.
या भागात येणार नियमित पाणी
पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर) : सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर,
कर्वे रोड ते एस.एन.डी.टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्र. पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर.
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड आणि परिसर भामा आसखेड जलकेंद्र : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी भाग
लष्कर ते खराडी पंपींग क्लोजरमुळे पाणी पुरवठा बंद होणारा परीसर : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदन नगर, सुनिता नगर, धर्म नगर, सोमनाथ नगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मते नगर, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी.