मुंबई – सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग नेहमीच आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे कौतुक मिळवत असतात. त्यांनी पंजाबी आणि हिंदी गाणे गायले आहे. ते आपल्या जादुई आवाजाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात. मात्र नुकतेच ते एका गाण्याच्या शूटिंगमुळे वादात सापडले आहे.
गायक @Sukhwindermusic का कहना है- धूप तेज थी, पांव जल रहे थे, इसलिए जूते पहने.
काशी में #खड़ाऊं भी तो मिलते है?जूते पहनकर हनुमान चालीसा का वीडियो स्वीकार्य नहीं 😔@AnupTiw40393128@AjaySri92648526@realhinduindia@UmangSh34730640@Abhishe04192697@narayan9299 pic.twitter.com/PGbiRuM9eK— Bhavin Thakkar (@Bhavint2312) March 29, 2022
वाराणसीच्या चेत सिंह घाटावर सुखविंदर हे हनुमान चालिसाच्या म्युझिक व्हिडिओचं शूटिंग करत होते. या शूटिंगवेळी पायात बूट घालून नाचताना ते दिसले.
या शूटिंगचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताच सोशलवर मीडिया युजर्सकडून या व्हिडिओवर टीका होत आहे. युजर्सला सुखविंदर आणि त्यांच्या सहकलाकारांनी ‘हनुमान चालिसा’वर पायात शूज घालून नाचणं युजर्सना आवडलं नाही. या व्हिडिओवर अनेक लोकांनी हिंदू धर्माचा अपमान केला असं म्हणत टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच सुखविंदर यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.