बावधन – “सुकन्या समृद्धी योजना’ महत्त्वाची असून, बावधन परिसरातील कुटुंबांना या योजनेचे पासबुक वाटप केल्यावर मुलीच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमच्या कामाची पावती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अभिजित राजेंद्र दगडे पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप करण्यात आले. त्यावेळी दगडे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, महेश हांडे, संदीप बालवडकर, योगेश सुतार, तानाजी दगडे, पोलीस पाटील बबनराव दगडे, राजेंद्र भुंडे, नीलेशा दुधाळे, गणेश दगडे, काशिनाथ भुंडे उपस्थित होते.