मुंबई : बॉलिवूडमध्ये मैं जिंदा हूं, धारावी, इस रात की सुबह नहीं,चमेली, हजारो ख्वाहिशें असे थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता प्रेक्षकांसाठी लवकरच नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर एकत्र दिसणार आहे.
या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात बाबत भूमीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे,”#Afwaah! थ्रिलर चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.’ सोबत तिने या फोटो शेअर केले आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना भूमी म्हणाली,’नवाजुद्दीन सिद्दीकी हा देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही अशा कुशल अभिनेत्यासोबत काम करता तेव्हा तुम्हाला तुमची मेहनत दुप्पट करायची असते. सुधीर सर नेहमीच माझ्या बकेट लिस्टमध्ये असतात. हे आणखी खास आहे कारण ‘भीड’ नंतर मी अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांच्यासोबत पुन्हा काम करत आहे. या चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी अत्यंत रोमांचित आहे’.