पिंपरी – पोलीस आयुक्तालयात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रिपाईच्या माजी मावळ तालुका अध्यक्षावर चिंचवड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अमित माणिक छाजेड (रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई कल्याणी तुकाराम गाडवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आरोपी अमित छाजेड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. छाजेड यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडविल्याचा आरोप करत छाजेड याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.