मुंबई – छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ आपल्या अंतिम वाटचालीकडे प्रवास करत असून, येत्या १५ फेब्रुवारीला या सिजनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. दरम्यान, यापूर्वीच बिग बॉसचा को होस्ट अभिनेता सलमान खानने यंदाच्या सिजनची ‘बिग बॉस १३’ची ट्रॉफी कशी असणार याची एक झलक दाखवली.
View this post on Instagram
बिग बॉस १३ ची ट्रॉफी फार सुंदर आहे. ट्रॉफीमध्ये सीझन १३ च्या लोगोप्रमाणे BBचं साइन तयार करण्यात आलं आहे. BB च्या चारही बाजूंना आकर्षक डायमण्ड लावण्यात आले आहेत. तसेच ट्रॉफीला निळ्या रंगाचं बॅकग्राउंड देण्यात आलं आहे. गेल्या सीझनच्या ट्रॉफीपेक्षा १३ व्या सीझनची ट्रॉफी पूर्ण वेगळी आहे.