रिझर्व्ह बॅंकेचा असाही रेकॉर्ड

ट्विटरवर 10 लाख फॉलोअर्स

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 10 लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी याबद्दल आनंद व्यक्‍त केला.

ट्विटरवर आरबीआयचे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीय सेंट्रल बॅंकेपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत.त्याचबरोबर सोशल मीडियावरही भारतीय रिझर्व्ह बॅंक सर्वाधिक लोकप्रिय बॅंक आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या ट्विटर हॅंडलनुसार, 20 सप्टेंबर 2020 पर्यंत 9 लाख 66 इतके फॉलोअर्स होते, तर आज रविवारी 22 नोव्हेंबर 2020 ला ही संख्या 10 लाख 513 पर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे आरबीआय जगातील इतर बॅंकांच्या तुलनेत खूपच उशिरा ट्विटरवर जोडली गेली. मात्र आरबीआयने इतरांपेक्षा खूपच कमी वेळेत हा कारनामा करून दाखविला आहे.

जगातील सर्वाधिक शक्‍तिशाली बॅंक असलेली अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅंकेची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या केवळ 6.67 लाख आहे, तर यूरोपीय केंद्रीय बॅंकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 5.91 लाख इतकी आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंक 85 वर्षे जुनी आहे. आरबीआयने ट्विटर खाते जानेवारी 2012 पासून सुरू केले. फेडरल रिझर्व्हने मार्च 2009 पासून तर यूरोपच्या केंद्रीय बॅंकेने ऑक्‍टोबर 2009 पासून ट्विटरवर खाते उघडले आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांचे ट्विटरवर वेगळे खाते असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.35 लाख इतकी आहे.

आरबीआय या यादीत प्रथम स्थानावर असून मॅक्‍सिकोची केंद्रीय बॅंक दुसऱ्या स्थानावर आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या 7.74 लाख आहे. तर तिसऱ्या स्थानावर बॅंक ऑफ इंडोनेशिया आहे. तिच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 7.57 लाख आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह चौथ्या स्थानावर तर यूरोप केंद्रीय बॅंक पाचव्या स्थानावर आहे. बॅंक ऑफ जपान 10 व्या स्थानावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.