राजगुरुनगर -महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) खेड तालुक्याचा बारावीचा निकाल 87.91 टक्का लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरूनगर, नवमेश विद्यालय, चाकण या दोन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल कडूस येथील रामभाऊ म्हाळगी कनिष्ठ महाविद्यालयाचा 64.70 टक्के लागला आहे.
तालुक्यातील 28 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल टक्क्यांमध्ये
हुतात्मा राजगुरू महाविद्यायालय (राजगुरुनगर) : 92.88. कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय (वाडा) : 91.60. सिताबाई पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय (चाकण) : 89.02. संत ज्ञानेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यायालय (आळंदी) : 87.71. म. फ. गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय (दावडी) : 75.67. रामभाऊ म्हाळगी कनिष्ठ महाविद्यालय (कडूस) : 64.70. सुमंत उच्चमाध्यमिक विद्यालय (पिंपरी बुद्रुक): 85. 29. नविन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मरकळ) : 96.24. शिवाजी विद्यालय (डेहणे) : 77.04.
रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय (आळंदी) : 80.59. कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (पाईट) : 69.56. नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय (काळूस) : 86.36. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (राजगुरूनगर) : 100. श्री भामचंद्र विद्यालय (भांबोली) : 93. 69. पी. के. महाविद्यालय कडाचीवाडी (चाकण) : 93.29. भैरवनाथ विद्यालय (वाकी) : 92.30. भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (दोंदे): 94.28. उच्च माध्यमिक विद्यालय (वाशेरे) : 86. 79. नवमेश विद्यालय (चाकण) :
100. बी. एम. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (बिरदवडी) : 96.96. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (डेहणे) : 91.66. कला, वाणिज्य महाविद्यालय (राजगुरूनगर) : 89.85. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (राजगुरूनगर) : 83.33. शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोब शेठ कनिष्ठ महाविद्यालय (चाकण) : 88. श्री समर्थ माध्यमिक विद्यालय (चिंबळी) : 85. सुभाष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (खेड) : 73.68. श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय (नाणेकरवाडी) : 71.42. ज्ञानवर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय (खेड) : 78.57. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालकांकडून अभिनंदन करण्यात आले.