श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज व पूना नाईट हायस्कूल परीक्षेचा निकाल 71 टक्के
पुणे – पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजचा परीक्षेचा निकाल 71 टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या 31 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थी व 6 विद्यार्थिंनीपैकी तिघी उत्तीर्ण झालेल्या आहेत.
उबेद खान या विद्यार्थ्याने 60.40 टक्के गुण मिळवून प्रथम, राजू वाबळे याने 54 टक्के गुण मिळवून द्वितीय, मंगेश दळवी याने 53.40 टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळविला आहे.
राहूल चव्हाण याने 52.20 टक्के तर काजल शिवशरण हिने 48 टक्के गुण प्राप्त केले आहेत. दिवसा काम करून विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेत परीक्षेत यश मिळविले आहे. यातील पहिल्या तीन आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीसाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेचे चेअरमन प्रा.विनायक आंबेकर, शाळा समितीचे अध्यक्ष संजय जोशी, प्राचार्य अविनाश ताकवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.