चिंबळी- सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी पाच परिविक्षाधिन वर्ग-“अ’ अधिकाऱ्यांनी मरकळ (ता खेड) गावाचा आभ्यास दौरा केला. त्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आरोग्य केंद्र आदि महत्त्वाच्या संस्थांना भेटी देत त्यांची माहिती जाणून घेतली.
यात उपजिल्हा अधिकारी प्रमोद कुदळे, सहायक राज्यकर आयुक्त प्रमोद डुके तहसीलदार योगेश्वर टोपे, तहसीलदार प्रथमेश घोलप, उद्योग उपसंचालक दीपक जाधव या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या अभ्यास दौऱ्याप्रसंगी या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोलाची मदत केली. तसेच ग्रामपंचातीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.