लासुर्णे- लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पाच विद्यार्थ्यांची पुणे जिल्हा स्पोर्ट चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. सोमवार (दि.16) रोजी श्री निलकंठेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सहा खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी पाच खेळाडूंची राज्यस्तरीय निवड झाली आहे. यामध्ये 3 गटात स्पर्धा झाली.
12 वर्षे वयोगटातील मकरंद चंद्रकांत निंबाळकर, 14 वर्षे वयोगटातील अजय रावसाहेब निंबाळकर, सुभाष घोरपडे, 17 वर्षे वयोगटातील नितीन मारुती लोखंडे, तेजस रामचंद्र गायकवाड यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. यावेळी छत्रपती सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, ऍड तेजसिंह पाटील, प्राचार्य एन. ए. मोमीन, पर्यवेक्षक जे. जी. गावडे, आय. बी. आवाळे, टी. एस. खताळ, जे. एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.