दि.19 फेब्रुवारी 2020 रोजी झील महाविद्यालयामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्यातील शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान समजलं जातं.
झील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या हार्दिक ठाकूर यानी हा सोहळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न आपल्या रांगोळीच्या माध्यमातून केला आहे. शिवजयंतीनिमीत्त झील महाविद्यालयानी अनेक उपक्रम राबवले होते. रांगोळी प्रदर्शन हा सुद्धा त्याचाच एक भाग होता.
आपल्या आठ साथीदारांच्या मदतीने हार्दिकने २२×१५ अशी रांगोळी केवळ चार दिवसात साकारली आहे म्हणून सर्व स्तरातून हार्दिक आणि त्याच्या साथीदारांचे कौतुक होत आहे. या आधी सुद्धा हार्दिकने अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या रांगोळीच्या माध्यमातून प्रतिकृती बनवल्या आहेत.
- – राज देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग