अथेन्स – युरोप आजकाल कडक उन्हाळा आणि उष्ण वारे यांच्याशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत ग्रीसच्या जंगलात वणवा लागल्याचे वृत्त आहे. ही आग इतकी भीषण आहे की, आतापर्यंत 35 चौरस किलोमीटर जंगल जळून खाक झाले आहे. बाधित ठिकाणांहून लोकांना मोठ्या प्रमाणात हलवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, बुधवारी रात्री आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र जोरदार वाऱ्यामुळे गुरुवारी ती पुन्हा अनियंत्रित झाली.
ग्रीक अग्निशमन विभागाने सांगितले की, गेल्या 24 तासांत ग्रीसच्या जंगलात 62 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रीसच्या पश्चिम अटिका भागात लागलेल्या आगीमुळे लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. काही लोक घरे सोडण्यास तयार नसून प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. 72 वर्षीय क्रिसोला रिनेरीने दावा केला की तिचे काही नातेवाईक तिचे घर वाचवण्यासाठी आले होते परंतु प्रशासनाने या भागाचा पाणीपुरवठा खंडित केला.
जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ग्रीस आणि रोड आयलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. एल निनो प्रभावामुळे युरोपमध्ये सध्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. युरोपातील उष्णतेने रोज नवनवे विक्रम मोडीत काढले आहेत.