मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चित्रपटात झळकणार आहे. आता मानुषीचे चाहते तिला मोठया पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मानुषी या चित्रपटासाठी खुप परिश्रम घेत आहे आणि तिला चित्रपटात भारतीय महिलांची एक सशक्त भूमिका साकारणार आहे.
याबाबत मानुषी म्हणाली, या चित्रपटातील भूमिका करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम घेत आहे. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून प्रेम मिळवण्याचा मी प्रयत्न करीत आहे, जो खूप कठीण आहे. मला सिनेमातून भारतीय महिलांची एक सशक्त प्रतिमा ठेवायची आहे की ती सुंदर असतानाही ती सशक्त, स्वतंत्र आणि कणखर व्यक्ती आहे.
दरम्यान, या सिनेमात अक्षय कुमार राजा पृथ्वीराज चौहानच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर मानुषी छिल्लर त्यांची मैत्रिण संयोगिताच्या भूमिकेत असेल. या भूमिकेबद्दल मानुषी म्हणाली, माझ्या दृष्टीने संयोगिताचे पात्र स्वप्नासारखे आहे.
हे पात्र चांगल्या प्रकारे साकारण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती साकारण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पृथ्वीराज हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला प्रदर्शित होऊ शकते.