नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई; वसूल केला तब्बल ‘इतका’ दंड

शेलपिंपळगाव -करोना रोगाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर चाकण पोलिसांकडून बेधडक कारवाई केली. या कारवाईत येथील पोलिसांनी हॉटेल चालकांसह एकूण 4 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 89 केसेस, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकावर, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 28 जणांवर, त्याचप्रमाणे आस्थापनावर घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर एकूण 8 केसेस अशा एकूण 738 लोकांवर धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.

जिल्हाधिकारी पुणे व पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी कोविड 19 च्या अनुषंगाने रात्री 8 ते सकाळी सात या दरम्यान सर्व आस्थापना बंद करण्याबाबत, त्याचप्रमाणे लोकांना जमावबंदीचे आदेश असताना रात्री 9 पर्यंत चाकण पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान चाकण मार्केट परिसरात समाधान हॉटेल व बिअरबार ही आस्थापना चालू असलेली मिळून आली. हॉटेलमध्ये जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या लोकांवर प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची कारवाई असा 33 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले की, साई कृपा मंगल कार्यालय वाकी बुद्रुक, मातोश्री मंगल कार्यालय मोहितेवाडी, राधे सेल्स चाकण, द्वारका स्वीट्‌स चाकण, हॉटेल राजरत्न वाकी बुद्रुक, हॉटेल जगदंब रासे, हॉटेल पाटलाचा ढाबा रासे, हॉटेल दुर्वांकुर भोसे, हॉटेल तुळजाभवानी रासे, भंडारी सेल्स चाकण.

आदी आस्थापनावर मिळून एकूण 738 जणांवर केसेस करून एकूण चार लाख, दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे, अपर सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच चाकण पोलिसांकडून करण्यात आली.

जिल्ह्यात सर्वत्र धडक कारवाई
करोनाचा संसर्ग जिल्ह्यात पसरला आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभाग अलर्ट झाले आहेत. खेड, जुन्नर, आंबेगाव, बारामती, पुरंदर, इंदापूर, शिरूर, भोर तालुक्‍यांत करोनाचा कहर वाढत असल्याने नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले जात आहे. तरीही नियमांना तिलांजली देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. गेल्या महिन्यापासून पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. ही कारवाई आता आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.