पुणे – शहरात दैनंदिन सापडणाऱ्या नवीन करोना बाधितांचा आकडा अवघ्या महिन्याभरातच दहा पटींनी वाढला आहे. मागील महिन्यात 1 मार्च रोजी शहरात 406 नवीन रुग्ण सापडले होते. हा आकडा 31 मार्च रोजी 4 हजार 458 पर्यंत गेला आहे. तर, मागील वर्षी करोनाचे रुग्ण शहरात सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर 9 ते 31 मार्च या कालावधीत शहरात केवळ 37 रुग्ण होते. तर, यावर्षी मार्चमध्ये हा आकडा 60 हजारांपेक्षा अधिक नोंदविला गेल्याचे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे.
मागील वर्षी 9 मार्च रोजी शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर अद्यापही ही साथ शहरात सुरूच आहे. देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्याने केंद्राकडून 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्याही मर्यादीत राहिली. मात्र, 17 मेनंतर जसजसे लॉकडाऊन शिथील होण्यास सुरुवात झाली, तसतशी शहरातील नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढत राहिला.
तर, सप्टेंबर 2020 मध्ये शहरात उच्चांकी 2165 बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर शहरात ऑक्टोबरमध्ये करोनाची साथ ओसरण्यास करोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच येत्या एक-दोन दिवसांत काही कठोर निर्बंधांची घोषणा करण्यात येईल.
राज्यातील नागरिक 15 दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर नक्कीच करोनाची साखळी तुटू शकते. मात्र, जर करोना आटोक्याच्या बाहेर गेलाच तर शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा म्हटल्यावर लॉकडाऊन करणे भागच आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
शहरात नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग करून तातडीने त्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहे. सध्या शहरात दिवसाला सरासरी 15 ते 16 हजार चाचण्या करण्यात येत आहेत.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका